खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली 'या' योजनेविषयी मोठी मागणी

डी. के. वळसे-पाटील
Wednesday, 29 April 2020

लॉकडाउन काळात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रस्ताव कृषी विभागाकडून सादर होऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रस्ताव सादर करण्यासाठी विमा योजनेला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मंचर : लॉकडाउन काळात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रस्ताव कृषी विभागाकडून सादर होऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रस्ताव सादर करण्यासाठी विमा योजनेला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आणखी वाचा - कोरोनाची बाधा शेजाऱ्यांना, त्यांचे मात्र क्वारंटाइन शिबिरात हाल

राज्य शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत असंख्य शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून कृषी विभागाकडे सादर केलेले शेतकऱ्यांचे प्रस्ताव अद्याप कृषी विभागाकडेच पडून आहेत. हे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवले न गेल्यास शेतकऱ्यांना अपघात विमा संरक्षणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या संदर्भात शेतकऱ्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्याशी संपर्क साधून विमा योजनेला मुदतवाढ देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत डॉ. कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांना पत्र पाठवून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा - पुण्या मुंबईतून लपून छपून आले; पण पोलिसांनी शिकवला धडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme should be extended says dr. Amol Kolhe