गोवर, रुबेलाची लस सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे - राज्यातील ४९ लाख विद्यार्थ्यांना पहिल्या चार दिवसांमध्ये गोवर आणि रुबेलाची लस देण्यात आली. यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याला लसीमुळे त्रास झाला नाही. त्यामुळे ही लस सुरक्षित असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

शाळेतील मुलांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्याची मोहीम २७ नोव्हेंबरपासून राज्यात सुरू झाली आहे. काही उर्दू शाळा वगळता राज्यातील सरकारी, महापालिका आणि खासगी शाळांनी याला प्रतिसाद दिला आहे.  

या बाबत राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप पाटील म्हणाले, ‘‘गेल्या चार दिवसांमध्ये राज्यातील ४८ लाख ८७ हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीचा त्रास झालेल्याचे एकही घटना राज्यात घडली नाही. त्यामुळे ही लस पूर्णतः सुरक्षित आहे.’’
राज्यात सुमारे १० हजार २५५ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून १० लाख ७७ हजार ३३८ बालकांना ही लस देण्यात आली. सहा आठवड्यात ९ महिने ते १५ वर्षांखालील सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

गोवर-रुबेलाची लस सुरक्षित आहे. त्यामुळे लसीकरणानंतर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. काही ठिकाणी या लसीकरणाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे पालकांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत बालकांना या दोन आजारांपासून अतिरिक्त संरक्षण मिळण्याकरिता ही लस टोचून घेणे आवश्‍यक आहे. या लसीमुळे कुठलाही विपरीत परिणाम होत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात एकाही बालकावर लसीकरणानंतर गंभीर दुष्परिणाम झाल्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे पालकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे.
- डॉ. दीपक सावंत, आरोग्य मंत्री

Web Title: gover rubella vaccination secure