Pune | सरकार वातावरण चिघळवतेय; दरेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव दाभाडे : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर.

तळेगाव : सरकार वातावरण चिघळवतेय; दरेकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे वातावरण चिघळत नसून सरकार वातावरण चिघळवत आहे. सरकारने संप फोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी संपकरी कर्मचारी आता करो या मरो या लढयाला उतरले असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनकरण करावे या मागणीसाठी सुरु असलेल्या विठ्ठलवाडीतील तळेगाव दाभाडे एसटी आगारासमोरील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी दरेकर यांनी शनिवारी (ता.१३) सकाळी भेट दिली. यावेळी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना दरेकर पुढे म्हणाले कि, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर ते तेवढीच उसळी मारुन वर येतील.आम्ही ताकतीने तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत.

हेही वाचा: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञानी द्राक्ष बागांची पाहणी

आतापर्यत ३९ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात.त्याचे सरकारला दुःख नाही.अजून किती बळी जाण्याची वाट पाहताहेत?आता फार अंत पाहू नका.एसटी कर्मचाऱ्यांना तत्काळ शासनाच्या सेवेत सामावून घेऊन न्याय द्यावा.लढ्याची एकजूट अभेद्य ठेवण्याचे आवाहनही यावेळी दरेकर यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केले.एसटी कर्मचारी संघटनेचे दिपक दगडखैर,गणेश मुंढे,

अमोल रणदिवे यांच्यासह माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे,रविंद्र माने आणि एसटी कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

loading image
go to top