राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञानी गोळेगावमधील द्राक्ष बागांची केली पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोळेगाव( ता.जुन्नर) : घडनिर्मिती न झालेल्या द्राक्ष बागेची पहाणी करताना राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ.आर.जी. सोमकुंवर यांच्यासह उपस्थित शास्त्रज्ञ व शेतकरी.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञानी द्राक्ष बागांची पाहणी

नारायणगाव : खरड छाटणी नंतर जुन्नर तालुक्यातील गोळेगाव परिसरात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या गारपीट व अतिवृष्टीचा परिणाम द्राक्ष बागांच्या घड निर्मितीवर झाला आहे.अपेक्षित घडनिर्मिती झाली नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. अशी माहीती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणेचे संचालक डॉ.आर.जी. सोमकुंवर यांनी दिली. जुन्नर तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत. ऑक्टोबर छाटणी नंतर प्रामुख्याने जंबो द्राक्ष

बागेत सलग दुसऱ्या वर्षी अपेक्षित घडनिर्मिती झाली नसल्याचे दिसून येत आहे.जंबो द्राक्षाच्या एका वेलीवर किमान पंचवीस घड निर्मिती होणे आवश्यक असताना काही बागेत पाच ते पंधरा घड निर्माण झाले असून घड जिरण्याचे प्रमाण जास्त आहे.या वर्षी विद्राव्य खते, औषधे यांच्या किंमतीत पंचवीस टक्के वाढ झाल्याने एकरी सुमारे चार लाख रुपये भांडवली खर्च होणार आहे. घड निर्मिती कमी झाल्याने उत्पादनात पन्नास टक्के घट होणार आहे.

हेही वाचा: नाशिक : कंगना विरोधात दाखल होणार देशद्रोहा गुन्हा

हे सर्व अनुभवाताना, पाहताना खुप काही शिकायला मिळाले. यादरम्यान अनेकांचे फोन, मेसेज आले, प्रत्येकाचा सुर होता की, नक्की काय ? या सर्वावरुन पडदा उचलावा, यासाठीच ही व्हिडीओ पोस्ट केल्याचे त्यांनी सांगितले. सर्व मिडीयाकर्मींपासून चाहत्यांपर्यत सर्व घटकांचे आभार मानून डॉ. कोल्हे यांनी आपल्या व्हिडीओ पाेस्टमध्ये विस्ताराने सर्व खुलासे केले.

ते म्हणतात, अज्ञातवासादरम्यान आलेल्या सर्व पोस्टवरुन मानसिक आरोग्यांच्या जाणीवेची गरज अधोरेखित झाली. अनेकांनी सकारात्मक तसेच नकारात्मक मांडणी केली, मात्र सर्वसामान्य माणसाला येवू शकणारा तसेच येवूनही दुर्लक्षिला जाणारा मानसिक थकवा ही मला सर्वांत महत्वाची गोष्ट वाटली. कमी वयातच तरुणांना हदयविकार, मधुमेहासह जडणारे इतर आजाराचे मुळ कारण हे मानसिक ताणतणाव हेच आहे, हे मी अभिनेता व लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर डॉक्टर या नात्याने सांगतोय. पुरुषाने आपल्या दु:खाचे, भावनांचे सार्वजनिकरित्या प्रदर्शन करायचे नसते, अथवा व्यक्तच व्हायचे नसते. या संस्कारातूनच मग व्यक्त होताना पुरुषाचा स्वभाव आक्रमक बनत जातो.

हेही वाचा: सोलापूर : सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी निधी

द्राक्ष विक्रीतुन मिळणारे उत्पन्न व भांडवली खर्च याचा मेळ बसणार नसल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत.अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके)अध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिली.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गोळेगावमधील द्राक्ष बागांची राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. सोमकुंवर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. प्रशांत निकुंभे यांनी पहाणी केली. पहाणी दौऱ्यात केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, उद्यानविद्या तज्ञ भरत टेमकर, मृदाशास्त्र तज्ञ योगेश यादव , उपविभागीय कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, तालुका कृषि अधिकारी सतिश शिरसाठ,निलेश बुधवंत, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक जितेंद्र बिडवई सहभागी होते.यावेळी गोळेगावमधील सचिन माळी, प्रभाकर डोके, दिपक कोकणे यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली.त्या नंतर नारायणगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत डॉ. सोमकुंवर यांनी घडनिर्मिती समस्येवर विवेचन केले.या वेळी केव्हीकेचे अध्यक्ष मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे व शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा: नागपूर : बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांच्या खुर्च्या रिकाम्या

डॉ. सोमकुंवर म्हणाले गारपिटीमुळे द्राक्ष काडयांना इजा झाली.खरडछाटणी नंतर ढगाळ वातावरण असल्याने काडयांमधील शरीरशास्त्रीय प्रक्रिया मंदावली गेली.यामुळे काडीमध्ये आवश्यक अन्नसंचय झालेला नाही. खरडछाटणीनंतर ३० ते ४० दिवसांच्या कालावधीमध्ये सुक्ष्म घडनिर्मिती होत असते. याच कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे द्राक्ष बागांमध्ये घडनिर्मिती अल्पप्रमाणात झालेली आहे .

अनिल मेहेर( अध्यक्ष कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव) : संकटग्रस्त द्राक्ष शेती वाचवण्यासाठी वीस मि.मी. पेक्षा मण्यांचा मोठा आकार असलेल्या जम्बो वाणाचे खत, पाणी , कॅनोपी व्यवस्थापन व योग्य रूटस्टॉकचा वापर याविषयी द्राक्ष संशोधन केंद्राने संशोधन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

loading image
go to top