सरकारकडून राज्यघटनेला धोका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

देहू - ‘‘केंद्रातील सरकारकडून देशाच्या राज्यघटनेला धोका आहे. राज्यघटना हटविल्यास देशात पुन्हा एकदा गुलामगिरी सुरू होईल,’’ असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शनिवारी (ता. १९) देहूरोड येथील ऐतिहासिक सुभाष चौकात केले.

विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्यांचा देहूरोड शहर पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. गणराज्य संघाच्या प्रा. सुषमा अंधारे, तळेगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, जयदीप गायकवाड, माजी बोर्ड सदस्य अमीन शेख, वंदना तरस, पोलिस पाटील सारिका आगळे व्यासपीठावर होते.

प्रा. कवाडे म्हणाले, ‘‘सध्याच्या सरकारने शेतकरी, गरीब जनतेला फसविले आहे. सरकारने या लोकांची माफी मागावी. राज्य घटनेचे देशातील १३० कोटी जनतेला सुरक्षाकवच आहे. तेच जर काढले तर देश पुन्हा गुलाम बनेल.’’
प्रा. अंधारे म्हणाल्या, ‘‘देशातील गरीब जनतेला अन्न, शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळणे आवश्‍यक आहे. सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे गरिबांचे हाल होत आहेत.’’

डॉ. किशोर यादव, बापूसाहेब गायकवाड, बाळासाहेब धावारे, परवेश शेख, बशीर शेख यांना प्रा. कवाडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कै. अनिल व्यवहारे (मरणोत्तर) यांचे कार्य गौरविण्यात आले.

अमीन शेख, जयदीप गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. रवींद्र कदम यांनी सूत्रसंचालन केले. अरुण जगताप, परशुराम दोडमणी यांनी संयोजन केले.

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डावर आरोप
देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या चार वर्षांत बोर्डाने मिळकत करात तिप्पट वाढ केली. तसेच मंगल कार्यालयाचे भाडे अडीच हजारांवरून १५ हजार केले. पीपी ॲक्‍टनुसार बोर्डाच्या हद्दीतील मतदारांची नावे कमी केली. रुग्णालयातील दर वाढविले. त्यामुळे बोर्डाच्या सदस्यांनी आपल्याला या भागातील जनतेने निवडून दिले आहे, याचे भान ठेवावे, असा सल्लाही प्रा. कवाडे यांनी या वेळी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Constitution Danger Jogendra kawade