ग्रामपंचायत निवडणूक : सरकारच्या निर्णयामुळे सरपंच पदासाठी बाशिंग बांधलेल्यांच्या पदरी निराशा

The government decision has caused frustration among those who are vying for the post of Sarpanch
The government decision has caused frustration among those who are vying for the post of Sarpanch

माळशिरस  : निवडणूक आयोगाने 8 डिसेंबर रोजी काढलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणानुसार निर्धारित आरक्षीत सरपंच पदाच्या जागेसाठी इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधुन तयारीला लागले होते. मात्र, निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याच्या राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या पदरी ग्रामपंचायत  निराशा आली आहे.

ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असलेल्या गावांसाठी यापूर्वी सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाल्याने त्या त्या आरक्षित जागेवरती आपली किंवा आपल्या पत्नीची वर्णी लागण्यासाठी इच्छुक कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करायला सुरुवात केली होती. आरक्षित जातीसाठी त्या जातीचे दाखले काढण्यापासून वार्डातील कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यापर्यंत इच्छुकांनी तयारी सुरू केली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आत्ता आपले सरपंच पद निश्चित असे गृहीत धरून अनेक इच्छुक जोरात तयारीला लागलेले दिसत होते . इच्छुकांच्या समर्थक कार्यकर्त्यांना मेजवानी देखील सुरू झालेल्या असताना आज अचानक राज्यसरकारने सरपंच पदासाठी निवडणूक पूर्व आरक्षण काढल्याने मोठ्या प्रमाणावर ती राखीव जागेसाठी होत असलेला घोडेबाजार थांबवण्यासाठी निवडणुकीच्या नंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचे जाहीर केल्याने या गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागलेल्या इच्छुकांच्या पदरी मोठी निराशा आली आहे.

निवडणूक लढवायची झाल्यास पुढील सरपंच पदाचे आरक्षण काय निघेल हे निवडणुकीनंतरच ठरणार असल्याने आपण निवडणूक लढवलेल्या जागेसाठी जर ते निघाले  तर ठीक अन्यथा इच्छा असूनही पाच वर्ष सदस्य पदावर समाधान मानण्याची वेळ अनेकांच्या वरती येणार आहे. यामुळे जोरात तयारी लागलेले कार्यकर्ते आता निवडणुकीत उतरायचे की नाही याबाबत साशंक दिसू लागले आहेत मात्र शासनाच्या या निर्णयाने मात्र गाव कारभाऱ्यांची, पॅनेल प्रमुखांची कोंडी झाली आहे.  

आरक्षित जागेवरती यापूर्वी निर्धारित केलेल्या उमेदवारांना संधी द्यायची की भविष्यातील आरक्षण बद्दल गृहीत धरून उमेदवार बदल करावयाचा याबाबत कसोटी पॅनल प्रमुखांची लागणार आहे. 

Corona Updates: पुण्यात हॉस्पिटलमधील रुग्णांचा आकडा ३ हजारांच्या आत

''सक्षम उमेदवारांना संधी मिळण्यास वाव- यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षण ज्या जागेसाठी निर्धारित झाले होते ती जागा वगळता इतर ठिकाणी राखीव असणाऱ्या जागेवरती सदस्य निवडताना तो किती सक्षम आहे याची तितकीशी काळजी पॅनल प्रमुख घेताना दिसत नसत मात्र आता भविष्यात काय सरपंच पदाचे आरक्षण निघेल याचा नेम नसल्याने आरक्षित जागेवर ती देखील केंद्रप्रमुखांना सरपंच पदाचा दावेदार म्हणून गृहीत धरून निवडावा लागणार आहे.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com