
पुणे : महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यीय प्रभाग पध्दती रद्द करून त्याऐवजी एक सदस्यीय वॉर्ड करण्यात येणार असल्याने नव्या बदलानुसार पुण्यात १६४ वॉर्ड आकारला येतील. या रचनेमुळे आगामी महापालिका निवडणुकांत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे पारडे जड होईल, अशी आशा महाविकास आघाडीला आहे. तर पुणे महापालिकेत बहुमत असलेल्या भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विधानसभेच्या 2014 निवडणुकीत सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युतीने महापालिकेच्या निवडणुका चार सदस्यीय पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला. बहुसदस्यीय प्रभागरचना भाजपच्या पथ्यावर पडल्याने बहुतांशी महापालिकांत या पक्षाची सत्ता आली. मात्र, सत्तांतर होताच महाविकास आघाडी नेत्यांनी भाजपची राजकीय कोंडी करण्याची नीती आखली आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करणारे विधयेक विधीमंडळाच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आले. त्यानुसार पुण्यासह सर्वच महापालिकेच्या निवडणुका एक सदस्यीय पध्दतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीकडून 'या' दोन नेत्यांना विधानपरिषदेचे गिफ्ट
महापालिकेची 2017 ची निवडणूक चार सदस्यीय प्रभागानुसार झाली. त्यात 41 प्रभाग अस्तित्त्वात आले, परंतु, त्यातील दोन प्रभाग हे तीन सदस्यांचे होते. त्यानुसार नगरसेवकांची संख्या 162 इतकी झाली. मात्र, आता ही प्रभाग पध्दती रद्द झाल्याने नव्या रचनेप्रमाणे नगरसेवकांच्या संख्येइतके प्रभाग अस्तित्त्वात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील 2011 च्या लोकसंख्या गृहीत धरून नवी प्रभागरचना केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रभागरचना,
निवडणुकांचे वर्षे, प्रभाग पध्दती आणि नगरसेवकांची संख्या
1992 -एक सदस्यीय- 85
1997 एक सदस्यीय 105
2002 तीन सदस्यीय 142
2007 एक सदस्यीय 152
2012 दोन स्दस्यीय 154
2017 चार सदस्यीय 162
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.