esakal | राष्ट्रवादीकडून पहिल्या टप्प्यात 'या' दोन नेत्यांना विधानपरिषदेचे गिफ्ट
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Leader Aditi Nalawade and shivajirao Garje may appointed as MLC

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई संघटक आणि सोशल मिडीया सेलच्या प्रमुख आदिती नलावडे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषेदेचे गिफ्ट मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत काम करणाऱ्यांना पदावर स्थान द्यायचे ठरविलेले धोरण अमलात आणले असून प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे यांनाही विधानपरिषेदेचे गिफ्ट दिले आहे.

राष्ट्रवादीकडून पहिल्या टप्प्यात 'या' दोन नेत्यांना विधानपरिषदेचे गिफ्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई संघटक आणि सोशल मिडीया सेलच्या प्रमुख आदिती नलावडे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषेदेचे गिफ्ट मिळणार आहे. पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी सोशल मीडियावर पक्षाची बाजू सावरण्याचे काम त्यांनी केले होते. त्या वरळी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचेही सांगण्यात येत होते. परंतु, वरळी विधानसभा मतदारसंघातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोणालाही उमेदवारी दिली नव्हती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत काम करणाऱ्यांना पदावर स्थान द्यायचे ठरविलेले धोरण अमलात आणले असून प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे यांनाही विधानपरिषेदेचे गिफ्ट दिले आहे. हे दोघेही तातडीने उद्याच आमदारकीची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंचा संभाजीराजेंना फोन; पत्राची घेतली तात्काळ दखल

राष्ट्रवादीकडून सहा वर्षांपूर्वी राज्यपाल नियुक्त सदस्य विधान परिषदेवर घेण्यात आले होते. त्यातील राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविली. ते निवडूनही आले. दुसरे राम वडकुते यांनी पक्षावर नाराज होत आमदाकीचा राजीनामा दिला होता. विधान परिषदेच्या या दोन जागा रिक्त झाल्याने राष्ट्रवादीने तातडीने आपले दोन नवीन चेहरे विधान परिषदेवर देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यात अमोल मिटकरी यांना संधी देईल, अशी चर्चा होती. मात्र त्यांच्याऐवजी या दोघांनी संधी मिळाली आहे.

सरकारी नोकरी हवी आहे? इथे आहेत संधी

कोण आहेत अदिती नलावडे 
खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवती संघटनेची स्थापना केल्यापासून आदिती सक्रीय आहेत. मुंबईतील अनेक प्रश्नांवर त्यांनी आजवर पक्षातर्फे आंदोलन केलेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाने त्यांच्याकडे डिजिटल प्रचाराची जबाबदारी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी मागच्यावर्षी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आदिती नलावडे यांनी थेट मातोश्री गाठत ठाकरेंना प्रतिकात्मक वाघ भेट म्हणून देण्याचे आंदोलन केले होते. त्यावेळी मातोश्रीवर जाऊन आंदोलन केल्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा झाली होती. 

प्रियकराचे नशिब जोरात; सगळीकडून मालामाल 

अदिती या विधानसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दत्ताजी नलावडे यांच्या पुतणी आहेत. वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. आक्रमक कार्यकर्त्या म्हणून त्यांचा परिचय आहे. गर्जे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सर्व कामकाज पाहतात.