Sasoon Hospital News: २१ एप्रिलपासून ससून रुग्णालयातील परिचारिका बेमुदत संपावर

जुन्या निवृत्तिवेतन योजनेसह रिक्त पदे भरणे, पदोन्नती व सेवानिवृत्ती वयवाढीच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास २१ एप्रिलपासून राज्यभर बेमुदत संप; ससून रुग्णालयातील परिचारिका संपावर जाणार
ससून रुग्णालयातील परिचारिका २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर! रुग्णसेवा कोलमडण्याची भीती; जुनी पेन्शन आणि पदभरतीसाठी पुकारले आंदोलन

ससून रुग्णालयातील परिचारिका २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर! रुग्णसेवा कोलमडण्याची भीती; जुनी पेन्शन आणि पदभरतीसाठी पुकारले आंदोलन

Sakal

Updated on

पुणे : राज्यातील सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात ‘राज्‍य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती ने २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. यामध्‍ये महाराष्‍ट्र गव्‍हर्नमेंट नर्सेस असोसिएशन (संलग्न फेडरेशन) देखील सहभागी होणार असल्‍याने ससून रुग्‍णालयामधील परिचारिका संपावर जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com