esakal | बारामतीत मका उत्पादकांसाठी मोठी संधी 
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत मका उत्पादकांसाठी मोठी संधी 

मका उत्पादक शेतक-यांनी आपला मका शेतमाल स्वच्छ व चांगला वाळवून आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बारामतीत मका उत्पादकांसाठी मोठी संधी 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : शेतक-यांच्या सोयीसाठी पुण्याच्या मार्केटींग फेडरेशन यांच्या मार्फत बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती व नीरा कॅनॉल संघाच्या सहकार्याने शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

जय शिवराय : राजगडावरील दुरुस्तीचे काम सुरू, पुरातत्व विभागाने घेतली दखल 

बारामती बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन झाले. मका उत्पादक शेतक-यांनी आपला मका शेतमाल स्वच्छ व चांगला वाळवून आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बाजारात लिलावात मक्याचे भाव हमीभावापेक्षा कमी निघत असल्याने सदर केंद्र सुरु करण्यात आले आहे. या मका खरेदी केंद्राची मुदत 30 जूनपर्यंत असल्याने शेतक-यांनी सदर केंद्राचा फायदा घ्यावा, असे आवाहन अनिल खलाटे यांनी केले आहे. 

 पुण्यातील दोन खासदार टाॅप फाईव्ह परफाॅर्मर 


मक्याचा हमीभाव 1760 रुपये प्रतिक्विंटल आहे. मका खरेदी केंद्रावर आतापर्यंत 45 मका उत्पादक शेतक-यांनी नाव नोंदणी केली आहे. शेतक-यांनी आपला मका शेतमाल माळेगाव बुद्रुक येथील शासकीय गोदामामध्ये स्वच्छ करुन व वाळवून आणावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. 


या उद्घाटनप्रसंगी बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजीराव टेंगले, बाजार समितीचे सदस्य रमेश गोफणे, काकडे, मदने लोखंडे, पुरवाठा अधिकारी संजय स्वामी, सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.