

Government nurses' strike disrupted OPD and healthcare services in Maharashtra hospitals.
Sakal
पुणे : सुधारित सेवा प्रवेश नियमांची अंमलबजावणी, सुधारित आकृतिबंधाला मंजुरी मिळावी, पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी तसेच रिक्त पदांची भरती आणि सेवा विषयक प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे यासाठी न्याय्य मागण्यांसाठी शासकीय सेवेत असणाऱ्या परिचारिकांनी मंगळवारी सकाळी दोन तास काम बंद आंदोलन केले. त्यामुळे, ससूनसह जिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांतील आरोग्यसेवा काही काळ विस्कळित झाली होती.