नेहरू युवा केंद्राकडून डॉ. बच्चूसिंग टाक यांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Government of India Nehru Youth Center ajit pawar  honor of Dr Bachchusingh Tak  pune

नेहरू युवा केंद्राकडून डॉ. बच्चूसिंग टाक यांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान

हडपसर : येथील सामाजिक कार्यकर्ते व जीवरक्षक डॉ. बच्चूसिंग टाक यांना त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र संघटन युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजीनगर पोलीस मैदानावर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा सन्मान झाला. सम्मानचिन्ह, पंचवीस हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. बच्चूसिंग टाक यांनी शहीद भगतसिंग जीवनरक्षक फाउंडेशनच्या माध्यमातून मागील पंचवीस वर्षापासून शेकडो लोकांचे विविध अपघातातून जीव वाचवले आहेत. कालवा, रेल्वे अपघातातील पाच हजाराहून अधिक मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिस प्रशासनास मदत केली आहे. याशिवाय कोरोना काळात अन्नदान, लोकांना अत्यावश्यक मदत, मास्क, इंजेक्शन, ऑक्सिजन, नातेवाईकांना मृतदेह पोचवणे इत्यादी कामे केली आहेत. याच काळात सर्वात जास्त रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून रक्त गोळा करून देण्याचा विश्वविक्रमही त्यांनी केला आहे. गरजू नागरिकांना मदत व्हावी याकरिता संस्थेच्यावतीने डॉ. टाक यांनी मोफत रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली आहे.