खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून शासकीय अधिकाऱ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Shinde

सावकारांकडून व्याजाने घेतलेले पैसे परत मिळविण्यासाठी सातत्याने लावल्या जाणाऱ्या तगाद्याला कंटाळून सहकार विभागातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून शासकीय अधिकाऱ्याची आत्महत्या

पुणे - सावकारांकडून व्याजाने घेतलेले पैसे परत मिळविण्यासाठी सातत्याने लावल्या जाणाऱ्या तगाद्याला कंटाळून सहकार विभागातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. हि घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.

गणेश शंकर शिंदे (वय 52, रा. बालाजी हाईट्‌स, मंगळवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव नाहे. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा यांना अटक करण्यात आली आहे. तर विजय सोनी याचे वडील, पंधरकर, शंकर लक्ष्मण गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिंदे यांच्या पत्नी शोभना शिंदे (वय 47) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे मुंबई येथे सहकार खात्यामध्ये विशेष लेखा परिक्षक (वर्ग 2) अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची व संशयित आरोपी सोनी, क्षीरसागर, साळुंखे, हाजरा, पंधरकर यांच्याशी ओळख होती. शिंदे यांनी आर्थिक अडचणीमुळे प्रारंभी एक लाख रुपये संबंधित सावकारकडून घेतले होते. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळे सावकारांकडून त्यांनी घेतलेली रक्कम 84 लाख 50 हजार रुपयांपर्यंत पोचली. मुद्दल, व्याज परत करण्यास त्यांना विलंब होऊ लागल्याने सावकारांकडून त्यांना त्रास देण्यास सुरुवात झाली. पंधरकर याने शिंदे आवश्‍यक कर्ज मंजुर करण्याचे आमिष दाखविले होते. पंधरकर याने कर्जमंजुरीसाठी शिंदे यांच्याकडून पैसेही स्विकारले होते.

दरम्यान, ऐनवेळी पंधरकरने कर्ज मंजुरीला नकार दिला. तसेच अन्य व्यक्तींकडूनही व्याजाने घेतलेल्या पैशांसाठी सातत्याने तगादा लावला जात होता. दरम्यान, सोमवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास शिंदे यांच्या पत्नी त्यांच्या मुलींना शाळेत सोडण्यासाठी गेल्या, त्या 15 मिनीटांनी पुन्हा घरी आल्या. त्यावेळी त्यांना शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दरम्यान, त्यांनी मृत्युपुर्वी चिठ्ठी लिहीली आहे, संबंधित चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ चार जणांना अटक केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज अभंग करीत आहेत.

Web Title: Government Official Committed Suicide After Being Harassed By Private Moneylenders Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..