

Revenue, Police, and Agri Departments to Resolve Public Grievances Under One Roof
sakal
सुनील जगताप
थेऊर : महाराष्ट्र शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत' मंडल भाग थेऊर येथे शनिवार, दिनांक ०२ मे २०२६ रोजी 'समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे शासकीय विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्न, तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत निकाली काढले जाणार असल्याचे प्रतिपादन हवेलीचे सभापती युवराज काकडे यांनी केले.