Prataprao Pawar AI in Farming : बारामती येथील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या उत्पादनामध्ये अभूतपूर्व सुधारणा केली आहे. बारामतीतील कृषी विकास ट्रस्ट (ADT) आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या संयुक्त प्रकल्पातून हा बदल घडतो आहे. या प्रकल्पाचे नाव 'फार्म ऑफ द फ्युचर' असून, या तंत्रज्ञानाचा फायदा घेत शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, कमी खर्च आणि शाश्वत शेतीचे मार्ग दाखवले जात आहेत.