मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरकारने बिनशर्त मागे घ्यावेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

खेड-चाकणमध्ये मराठा क्रांती मोर्च्यादरम्यान हिंसक घटना घडली. हा प्रकार मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी घडवला गेला. त्यात मराठा समाजातील लोकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे नव्या सरकारने बिनशर्त मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गरुवारी (ता. ५) केली आहे.

पुणे - खेड-चाकणमध्ये मराठा क्रांती मोर्च्यादरम्यान हिंसक घटना घडली. हा प्रकार मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी घडवला गेला. त्यात मराठा समाजातील लोकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे नव्या सरकारने बिनशर्त मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गरुवारी (ता. ५) केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शांताराम कुंजीर, मनोहर वाडेकर, अशोक भांडेकर, अतिश मांजरे, भगवान मेदनकर, संभाजी काकडे, धनाजी येळकर, बाबाजी कौटकर, परशुराम कासुळे, कुशल जाधव, सुदर्शन देवकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. वाडेकर म्हणाले, ‘‘कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी यापूर्वी मागील सरकारकडे पाठपुरावा केला. पण त्यांनी अटी घातल्या.. या प्रकरणांमध्ये जे पडकले गेले आहेत, त्यांचा दोष नसल्याचे पुरावे आम्ही सरकारला दिले आहेत. मात्र, अजूनही गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत.’’

कुंजीर यांनी सांगितले, की त्या वेळी मोर्च्यात बाह्य शक्ती घुसल्या होत्या. पण पोलिसांनी निर्दोष आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मागे सरकारने केवळ आश्‍वासने दिली आहेत. नव्या सरकारने विनाअट सर्वांवरील गुन्हे मागे घ्यावेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत.’’

‘‘पुणे, खेड, मावळ आदी भागातील सुमारे सातशे जणांवर, तर राज्यात साडेतेरा हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील काही गुन्हे काढल्याचे सांगितले जाते. परंतु त्यासंबंधी लिखित कागदपत्रे उपलब्ध नाहीत,’’ असे कुंजीर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government should withdraw the crimes against the Maratha protesters unconditionally