esakal | आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करा; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन

बोलून बातमी शोधा

लोणी काळभोर (ता. हवेली) : एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या तिसरा पदवीप्रदान समारंभात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.}

‘पदवीधर तरुणांनी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा. तसेच, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा,’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करा; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘पदवीधर तरुणांनी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा. तसेच, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा,’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या ऑनलाइन पद्धतीने झालेल्या तिसऱ्या पदवीप्रदान सोहळ्यात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी ‘इस्त्रो’चे माजी संचालक डॉ. के. राधाकृष्णन, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटी ग्रुपचे कार्याध्यक्ष राहुल कराड, एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. मंगेश कराड, डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश देशपांडे, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठातर्फे २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील एक हजार २३७ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. विद्यापीठातर्फे तीन विद्यार्थ्यांना पीएच.डी., तर २२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; बापट यांची मागणी

कोश्यारी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, डिझाईन किंवा अन्य कोणत्याही शाखेचे शिक्षण घेत असताना अध्यात्माचा अभ्यास करावा. नोकरीसाठी शिक्षण न घेता भविष्यात इतरांना नोकरी देणारे म्हणून पुढे यावे.’ कार्यक्रमात डॉ. मंगेश कराड यांनी प्रास्ताविक, तर प्रा. स्नेहा वाघटकर, प्रा. अशोक घुगे यांनी सूत्रसंचालन केले.

Edited By - Prashant Patil