esakal | संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; बापट यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay_Rathod_Pooja_Chavan

ऑडीओ क्‍लिपनुसार मंत्री राठोड यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचे आदेश अरुण राठोड नावाच्या युवकाला दिले.

संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; बापट यांची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येशी राज्याच्या वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडले जात आहे. या प्रकरणी भाजप युवा मोर्चातर्फे गुरूवारी (ता.25) वानवडी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणामध्ये खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी वानवडी पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन राठोडविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी; थेऊरच्या 'श्री चिंतामणी' मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद​

पूजा चव्हाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाकडून गुरुवारी सकाळी वानवडी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर स्वरदा बापट यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला.पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जानुसार, 7 फेब्रुवारीला पुजा चव्हाणची आत्महत्या झाल्यनंतर याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात मंत्री संजय राठोड आणि मृत पूजा चव्हाणच्या नावाच्या संभाषणाच्या 12 ऑडीओ क्‍लीप व्हायरल झाल्या होत्या. ऑडीओ क्‍लिपनुसार मंत्री राठोड यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचे आदेश अरुण राठोड नावाच्या युवकाला दिले.

हॉटेल की बेकायदा धंद्याचं कोठार! पुणे-सोलापूर हायवेवरील लॉजवर पोलिसांचा छापा​

ऑडिओ क्‍लीपवरून राठोड यांचे पुजाशी संबंध होते. सतच्या मानसिक त्रासाला कंटाळून, प्रेमभंग किंवा त्याच्याकडून दबावाला आणि छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. यानुसार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करणे यासाठी भारतीय दंड संहिता कलम 306 आणि 107 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना त्यांना अटक करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image