esakal | गणेश विसर्जनासाठी शिक्रापूर ग्रामपंचायत सज्ज, तीन विसर्जन हौद बांधून तयार
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जनासाठी शिक्रापूर ग्रामपंचायत सज्ज, तीन विसर्जन हौद तयार

विसर्जनासाठी शिक्रापूर ग्रामपंचायत सज्ज, तीन विसर्जन हौद तयार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शिक्रापूर: श्रीगणेश विसर्जनाचे दिवशी येथील वेळनदीवर निर्माल्य व गणेशमुर्तींपासून नदीचे जलप्रदुषण थांबविण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून झटणाऱ्या येथील इंद्रायणी ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्या पुजाताई दिपक भुजबळ यांचे मदतीला यावर्षी शिक्रापूर ग्रामपंचायत धावली असून, यावर्षी ग्रामपंचायतीने तीन ठिकाणी कृत्रिम हौद उभे करुन देवून आठ दिवस आधीच गणेशमूर्ती विसर्जन सज्जता करुन दिली आहे.

हेही वाचा: कोबीचे दर घसरले; शेतकऱ्याने कोबीवर फिरवला रोटर

येथील वेळनदीतील श्रीगणेशमुर्ती विसर्जित करण्याच्या कार्यक्रमातील निर्माल्य विसर्जन व श्रीमुर्ती विद्रुपीकरणाला बंधने यावीत म्हणून गेल्या सहा वर्षांपासून येथील येथील इंद्रायणी ग्रामिण विकास संस्थेच्या अध्यक्षा पुजाताई दिपक भुजबळ तसेच इंद्रायणी युवा गट व इंद्रायणी बचत गटाच्या वतीने गणेश विसर्जनाचे दिवशी येथील वेळनदीतिरावर आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत स्वच्छता मोहिम राबविली जाते. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीने गणेशभक्तांनी नदीवर येण्याऐवजी गणेश भक्तांच्या घरीच हौद घेवून मूर्तीचे विसर्जन उपक्रम केल्याने त्याल प्रचंड प्रतिसाद लाभला होता.

या उपक्रमात त्या गणेशमूर्तींचे शाडू माती व पीओपी असे विभाजन करुन मूर्तींचे यथोचित व पुजाविधीसह पर्यावरणपुरक सार्वजनिक विसर्जनही करण्यात येते तर निर्माल्य सेंद्रिय खतासाठी वापरले जाते. दरम्यान स्वत: पुजा भुजबळ, समता परिषदेचे विभागिय अध्यक्ष सोमनाथ भुजबळ यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या उपक्रमाच्या यावर्षीच्या ग्रामपंचायत निर्माल्य हौदांचे औपचारीक उद्घाटन उपसरपंच रमेश थोरात, माजी उपसरपंच सुभाष खैरे, सोमनाथ भुजबळ, योगीनी मांढरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

loading image
go to top