

Rural election preparations gain momentum after Gram Panchayat poll schedule announcement in Pune district.
Sakal
पुणे : पुण्यासह राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीचा प्रभागरचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील ८७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी लवकरच धुरळा उडण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून (ता.२०) प्रभागरचनेच्या कामाला सुरुवात होणार असून, सात एप्रिलला ग्रामपंचायतींच्या प्रभागांचे प्रारूप प्रसिद्ध होणार आहे.