पुण्यातील 'या' 3 ग्रामपंचायत हद्दीत होतेय कंटेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन

gram panchayats of Uruli Kanchan, Loni Kalbhor and Kadamwakwasti in Pune are violating the rules of containment zone
gram panchayats of Uruli Kanchan, Loni Kalbhor and Kadamwakwasti in Pune are violating the rules of containment zone

लोणी काळभोर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी तालुक्यातील वीसहून अधिक ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. ८) पासून बेमुदत काळासाठी कटेंनमेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) जाहीर केला आहे. कटेंनमेंट झोन जाहीर झाल्यास ग्रामपंचायत प्रशासनाने नागरीकांच्या विनाकारण फिरणाऱ्यावर निर्बंध घालणे, वाहनांना ग्रामपंचायत हद्दीत ये-जा करण्यास निर्बंध घालणे, पुर्व तपासणीशिवाय ग्रामपंचाय़त हद्दीत प्रवेश नाकारणे तसेच ग्रामपंचायत हद्दीत ये-जा करणाऱ्यांची नोंद करणे या प्रमुख गोष्टी करणे अपेक्षित असतात. मात्र या चार प्रमुख नियमापैकी एकही नियम उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या तीनही ग्रामपंचायत हद्दीत पाळले जात नसल्याने कंटेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन ग्रापंचायतीच्या तुलनेत उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत सध्या चाळीसहून अधिक कोरोनाचे अक्टीव्ह रुग्ण असल्याने, उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासनाने कटेंनमेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) कठोरपणे लागू करणे अपेक्षित होते. मात्र, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे व्यवसाय बंद ठेवण्याबाबतच्या कटेंनमेंट झोनमधील पाचपैकी एकाच आदेशाची अमंलबजावणी करुन, कटेंनमेंट झोनच्या नियमांचे उल्लघंन केले आहे. कटेंनमेंट झोन लागु करण्यास या ग्रामपंचायती अपयशी ठरल्याने, जिल्हाधिकारी कार्यालयानेच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरीकांनी केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत बोलताना उरुळी कांचनचे ग्रामविकास अधिकारी के.जी. कोळी म्हणाले, कटेंनमेंट झोन बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त आदेशाची व त्यातील करावयाच्या उपाय योजनांची माहिती सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना दिली आहे. मात्र गावात येणारे व बाहेर जाणारे रस्ते बंद करण्यावर सदस्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत होऊ न शकल्याने ही प्रक्रिया करता आली नाही. मात्र शनिवारी (ता.११) पासून कटेंनमेंट झोनमधील नियमांची सक्त अमंलबजावणी करण्यात येणार आहे. तर कदमवाकवस्तीचे ग्रामविकास अधिकारी प्रविण देसाई यांनी ही शनिवारी (ता. ११) पासुन कटेंनमेंट झोनमधील नियमांची सक्त अमंलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ठ केले आहे. 

पुणे जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सोमवारपासून लॉकडाऊन; या गावांचा असेल समावेश

Edited by : Sharayu Kakade

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com