
उमरगा : 'राष्ट्र ऑपरेशन सिंदूर' मार्फत भारतीय सेनेने केलेल्या अद्वितीय शौर्याच्या समर्थनार्थ शनिवारी (ता.२४) उमरगा तालुक्यातील तमाम राष्ट्रभक्ताच्या वतीने उमरगा शहरातुन भव्य तिरंगा पद यात्रा काढण्यात आली. 'तिरंगा आमचा अभियान, भारत आमचा प्राण, 'ऑपरेशन सिंदुर - भारताच्या अस्मितेचा गौरव, वीर जवानांना मानाचा मुजरा, 'भारत माता ती जय अशा घोषणांनी यात्रेत सहभागी झालेल्या राष्ट्रभक्त यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून गेला आहे. यात्रेमुळे तरुणांमध्ये देशभक्तीचे स्फुलिंग निर्माण झाले होते.