
सदाशिव विष्णू शेगर, नात अन्विता प्रल्हाद शेगर व स्वरा प्रल्हाद शेगर (वय ७) हे तिघे जण शेतीकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. जवळच हुतात्मा बाबू गेनू सागराच्या (डिंभे धरण) डावा कालवा आहे.
महाळुंगे पडवळ(पुणे) - चास (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील शेगरमळा येथे मंगळवारी दुपारी हुतात्मा बाबू गेनू सागराच्या डाव्या कालव्यात सदाशिव विष्णू शेगर (वय ७०) व त्यांची नात अन्विता प्रल्हाद शेगर (वय ९) यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सदाशिव विष्णू शेगर, नात अन्विता प्रल्हाद शेगर व स्वरा प्रल्हाद शेगर (वय ७) हे तिघे जण शेतीकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. जवळच हुतात्मा बाबू गेनू सागराच्या (डिंभे धरण) डावा कालवा आहे. अन्विता नजर चुकवून कालव्याकडे गेली. पाय घसरून कालव्यात पडल्याचे आजोबांनी पाहिले. आजोबांनी कालव्यात उडी घेऊन अन्विताला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तेही पाण्यात बुडाले. त्यावेळी स्वराने व परिसरातील महिलांनी आरडाओरड केला.
सिद्धेश संतोष शेगर याने परिसरातील तरुणांना घटनेची माहिती दिली. शेगरमळ्यातील दत्ता शेगर, रेवभाऊ शेगर, संतोष शेगर, मनोज बारवे व राहुल काळे या तरुणांनी तत्काळ कालव्यात उड्या घेतल्या. सदाशिव विष्णू शेगर व अन्विता प्रल्हाद शेगर यांना पाण्याबाहेर काढण्यात तरुणांना यश आले. तरुणांनी बन्सी शेगर यांच्या गाडीतून ताबडतोब आजोबा व नातीला घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वी दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.