esakal | निर्भया बलात्कार प्रकरण : अन् विनय कुमारने भिंतीवर डोकं आपटलं...
sakal

बोलून बातमी शोधा

Nirbhaya Criminal Vinay Sharma tried to injured himself at Tihar

चार आरोपींपैकी एक असलेल्या विनय शर्मा याने जेलमधील भिंतीवर डोकं आपटून स्वतःला जखमी केलं आहे. कडेकोट सुरक्षेत असतानाही विनयने हे पाऊल उचलले. 

निर्भया बलात्कार प्रकरण : अन् विनय कुमारने भिंतीवर डोकं आपटलं...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणी आरोपींना ३ मार्चला फाशी होणार आहे. अनेक अडथळ्यातून आणि विलंबानंतर चौघांच्या फाशीची तारीख ठरली अन् निर्भयाच्या आईने निःश्वास सोडला. पण अशातच आता आणखी नवीन घटना घडली आहे. चार आरोपींपैकी एक असलेल्या विनय शर्मा याने जेलमधील भिंतीवर डोकं आपटून स्वतःला जखमी केलं आहे. कडेकोट सुरक्षेत असतानाही विनयने हे पाऊल उचलले. 

Nirbhaya Case : दोषी मुकेश कुमारची आई म्हणते, 'माझ्या मुलाला एक संधी द्या'

दिल्लीतील निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणाला अखेरचे वळण मिळणार आहे. ३ मार्चला या सर्वांना फाशी होईल. मात्र, यापूर्वी या चारही आरोपींना तिहार जेलमध्ये वेगवेगळे ठेवण्यात आले आहे.  त्यांना कडेकोट सुरक्षा देण्यात आली आहे, मात्र अशा परिस्थितीतही विनय कुमारने भिंतीवर डोकं आपटून स्वतःला जखमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे तिहारमध्ये खळबळ उडाली आहे. 

निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीची तारीख ठरली; पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

चार आरोपींना फाशी निश्चित झाल्याचे कळताच, त्यांच्या वागणूकीत बदल झाला आहे. काहींनी जेवण कमी केले आहे, तर काहींनी बोलणे सोडून दिले आहे. विनयने दोन दिवसांपूर्वीच जेवण सोडले आहे. आता कोणत्याही प्रकारे फाशी टळणार नाही हे समजल्यानंतर आरोपींचे असे प्रकार सुरू झाले आहेत. तसेच त्यांना इच्छा विचारल्या असता त्याही सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोपींनी हरमार्गाने फाशी लांबविण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता त्यांच्याकडील सर्व पर्याय संपल्याने ३ मार्चला त्यांना फाशी होणारच असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.  फाशीसाठी गळ्याचे माप घेतल्यानंतरही चौघे ढसाढसा रडले होते. विनयच्या आईने यापूर्वी एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी चौघांना फाशीवर लटकविणे अयोग्य असल्याचे सांगितले होते.  

loading image
go to top