Video : जेव्हा नातू आजोबा शरद पवारांना फर्स्ट ड्राईव्हला नेतो अन्...

मिलिंद संगई
Sunday, 6 September 2020

नातू विजय सुळे याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गाडी चालवत आपल्या ड्रायव्हिंगचा वेगळाच आनंद दिला. तो क्षण स्वत: शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी मनात साठवून ठेवला.

बारामती : मुले गाडी चालवायला शिकतात तेव्हा त्याचा पालकांना वेगळाच आनंद असतो. मग ते सेलिब्रेटी असले तरी त्याला अपवाद ठरत नाहीत. खासदार सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे यालाही आज वाहन चालविण्याचा परवाना मिळाला आणि त्या नंतर त्याने आपल्या आजोबांना म्हणजेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गाडी चालवत आपल्या ड्रायव्हिंगचा वेगळा आनंद दिला. तो क्षण स्वत: शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी मनात साठवून ठेवला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी एक आई म्हणून आपला मुलगा नविनच गाडी चालवायला शिकणे हे पाहून एक वेगळाच आनंद होतो आहे, या शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद पवारांना ड्राईव्हला घेऊन निघालेला असल्याने गाडी हळू चालव, हॉर्न वाजवू नकोस, अशा सूचना आईने तरीही त्याला दिल्याच. आपल्या गाडीवर एल म्हणजे लर्निंग हे चिन्ह आहे याचीही आठवण सुळे यांनी विजयला करुन दिली. 

दरम्यान, या छोट्या गोष्टी सगळ्यांना छोट्या वाटतात, पण आईसाठी या गोष्टी खूप वेगळ्या असतात. या गोष्टीचं मोल आईसाठी वंगळंच असतं. आमच्यासाठी विजयचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर त्याने आजोबांना ड्रायव्हिंगला घेऊन जाणं हा क्षण एक स्पेशल मोमेंट आहे, अशा शब्दात सुळे यांनी याचे वर्णन केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या ड्रायव्हिंगच्या अनुभवाचे त्यांनी फेसबुकवरुन लाईव्ह प्रक्षेपण करत हा क्षण सर्वांसाठीच उपलब्ध करुन दिला. ज्येष्ठ नेते शरद पवार शेजारी बसलेले असल्याने विजयने गाडी व्यवस्थित चालवावी अशीच सुप्रिया सुळे यांची अपेक्षा या वेळी दिसून आली. या अगोदर सुळे यांची कन्या रेवती हिनेही आजोबांना गाडी चालवत नेल्याची दृश्ये माध्यमातून पुढे आली होती. आजचाही क्षण सुळे व पवार कुटुंबियांसाठी अविस्मरणीय असाच होता. 

पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grandson first drive with grandfather sharad pawar