

पान १२- २४ साठी
०००००००००००००००००००००००००
द्राक्ष आंबिया बहरासाठी विमा योजनेतील तरतुदी
------------------------------------------------
विनयकुमार आवटे
----------------------------------------------
द्राक्ष पिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदविलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. द्राक्ष पिकास खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण मिळते.
पीक : द्राक्ष (अ) समाविष्ट जिल्हे : नाशिक, अहिल्यानगर, बुलडाणा
हवामान धोका व कालावधी विमा संरक्षण कालावधी व नुकसान भरपाईची रक्कम (प्रति हेक्टर रुपये)
अ) अवेळी पाऊस
प्रति दिन (मि.मी.) ता. १६ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर ता. ८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ता. १ डिसेंबर ते ३० एप्रिल
टप्पा -१ टप्पा - २ टप्पा - ३
(>=४) ४ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त ४९८८ १२७०६ १२७०६
(>=११) ११ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त ७६५९ १९००० २५५३१
(>=२१) २१ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त ९८५६ ३८७१३ ३१२३१
(>=३१) ३१ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त १२८२५ ५७३५६ ५१०६३
(>=४१) ४१ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त १९११९ १५२८३१ ६४,२४४ + पहिल्या व दुसऱ्या, टप्प्यातील शिल्लक रकमेच्या ५० टक्के रक्कम देय.
(>=५१) ५१ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त ३८२९७ २०४२५० ७६,६५३ + पहिल्या व दुसऱ्या टप्यातील शिल्लक रकमेच्या १०० टक्के रक्कम देय.
टप्यानुसार कमाल नुकसान भरपाई रक्कम ३८२९७ २०४२५० ७६,६५३ + पहिल्या व दुसऱ्या टप्यातील शिल्लक रकमेच्या १०० टक्के रक्कम देय.
ब) दैनंदिन कमी तापमान दैनंदिन कमीत कमी तापमान (डिग्री सेल्सिअस (प्रति हेक्टर रुपये)
विमा संरक्षण कालावधी :१ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी
दैनंदिन कमी तापमान ३.५१ ते ४.०० ३.०१ ते ३.५० २.५१ ते ३.०० २.०१ ते २.५० २ पेक्षा कमी
नुकसान भरपाई रक्कम रु. १२११३ १८२८८ २४३४४ ३६४५६ ६०८००
गारपीट ता. १ जानेवारी ते ३१ मे विमा संरक्षित रक्कम रु. प्रति हे. १,२७,०००
पीक : द्राक्ष - (ब)
समाविष्ट जिल्हे :- लातूर, सोलापूर, पुणे, धाराशिव, जालना, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, सांगली
हवामान धोका व कालावधी विमा संरक्षण कालावधी व नुकसान भरपाईची रक्कम
(प्रति हेक्टर रुपये)
अवेळी पाऊस प्रति दिन (मि.मि) दि. १६ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर ता. ८ ते ३० नोव्हेंबर ता. १ डिसेंबर ते ३० एप्रिल
टप्पा- १ टप्पा- २ टप्पा - ३
(>=४) ४ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त ४,८६९ १२,५८८ १२,९४४
(>=११) ११ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त ७,४८१ १८,८८१ २५,५३१
(>=२१) २१ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त ९,९७५ ३७,८८१ ३१,८२५
(>=३१) ३१ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त १२,५८८ ५७,००० ५०,८२५
(>=४१) ४१ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त १८,६४४ १,५२,७१३ ६२,९३८ + पहिल्या व दुसऱ्या टप्यातील शिल्लक रकमेच्या ५० टक्के रक्कम देय.
(>=५१) ५१ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त ५०,११२ २,२८,००० १,०१,८८८ + पहिल्या व दुसऱ्या टप्यातील शिल्लक रकमेच्या १०० टक्के रक्कम देय.
टप्यानुसार अधिकत्तम नुकसान भरपाई रक्कम रु. ५०,११२ २,२८,००० १,०१,८८८
गारपीट ता. १ जानेवारी ते ३१ मे विमा संरक्षित रक्कम रु. प्रति हे . १,२७,०००
भाग घेण्यासाठी अंतिम मुदत ः १५ ऑक्टोबर २०२६
नियमित विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर ः रु. ३,८०,०००/-
गारपिटीपासून नुकसानसाठी विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर ः रु. १,२७,०००/-
गारपिटीपासून नुकसान झाल्यास नुकसानीची घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस नुकसानीची सूचना देणे आवश्यक आहे . (केंद्र शासन हेल्पलाइन १४४४७)
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता साधारण विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के मर्यादेत ः रु. १९,००० /- प्रति हेक्टरी. नियमितसाठी आणि गारपीट साठी रु. ६३५०/- हेक्टरी. (विमा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्तामध्ये वाढ असेल.)
महत्त्वाच्या बाबी ः
-विमा योजनेत भाग घेण्यासाठी आवश्यक किमान वय ः २ वर्षे पूर्ण झालेली उत्पादनक्षम बाग.
-शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅग नोंदणी क्रमांक बंधनकारक आहे.
- डिजिटल कॉपी सर्व्हे बंधनकारक आहे.
- पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
- बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी ॲग्रीस्टॅग नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२, ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकावरील बँक खात्याबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
- विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडलातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांनी फळपिक लागवड केलेली नसताना किंवा उत्पादन योग्य फळपीक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.
- शेतकऱ्यांनी फक्त स्वतःच्या जमिनीवर विमा घ्यावा.
- शेतकऱ्यांना डिजिटल कॉपी सर्व्हे बंधनकारक आहे. डिजिटल कॉपी सर्व्हे आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज केव्हाही रद्द होऊ शकतो.
- एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक अधिसूचित फळपिके असल्यास तो या सर्व पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो.
- या योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी ४ हे. मर्यादेपर्यंत राहील.
-विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंट साठी लिंक असावे.
-शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in
द्राक्ष पिकासाठी मृग बहर २०२६ मध्ये सहभाग घेतला असल्यास त्यांना द्राक्ष पिकासाठी पुन्हा आंबिया बहर २०२६-२७ मध्ये सहभाग घेता येणार नाही.
-शेतकऱ्यांनी उत्पादन योग्य फळपीक नसताना विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना पुढील ५ वर्षे कृषी योजनांचा लाभ देण्यात येणार नाही. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.
-अधिक माहितीसाठी १४४४७ या हेल्प लाइनवर संपर्क साधावा किंवा आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.
----------------------------------------------------------------------
(लेखक कृषी आयुक्तालयामध्ये कृषी संचालक (नियोजन व प्रक्रिया) आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.