बारामतीचा कोरोनाचा आलेख उतरू लागला खाली

मिलिंद संगई, बारामती
Wednesday, 30 September 2020

बारामतीतील आरटीपीसीआर व रॅपिड अँटीजेनच्या चाचण्यांची संख्या आता हळुहळू घटू लागली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांचीच संख्या अधिक असल्याने लोकांच्या मनातील भीती आता दूर होऊ लागली आहे. मास्क, सॅनेटायझर्सचा वापर, अनावश्यक घराबाहेर पडणे बंद करण्यासह इतरही काळजी घेतली जात असल्याने कोरोनाचा संसर्गही कमी होऊ लागला आहे. 

बारामती : शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आलेख झपाट्याने खाली येऊ लागल्याने प्रशासनासह नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बारामतीत 14 दिवसांच्या लॉकडाऊननंतर रुग्णांचा आकडा कमी होऊ लागल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने तपासण्यांचीही संख्या हळुहळू कमी होऊ लागली असून आता रुग्णांना रुग्णालयात जागा न मिळणे, रेडेमेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा याच्याही तक्रारी नगण्य झाल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामतीतील आरटीपीसीआर व रॅपिड अँटीजेनच्या चाचण्यांची संख्या आता हळुहळू घटू लागली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांचीच संख्या अधिक असल्याने लोकांच्या मनातील भीती आता दूर होऊ लागली आहे. मास्क, सॅनेटायझर्सचा वापर, अनावश्यक घराबाहेर पडणे बंद करण्यासह इतरही काळजी घेतली जात असल्याने कोरोनाचा संसर्गही कमी होऊ लागला आहे. 

दरम्यान काल बारामतीत 35 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले. दरम्यान तालुक्यातील निंबूत, होळ व सांगवी या गावामध्ये 2800 कुटुंबाची तपासणी करण्यात आली. त्या पैकी संशयित असलेल्या 157 जणांच्या अँटीजेन तपासणी करण्यात आली.  यात होळमध्ये 6, निंबूत येथे 5 तर सांगवीमध्ये 16 असे एकूण 27 रुग्ण पॉझिटीव्ह सापडले. शहरापेक्षा आता तालुक्याचा आकडा गेल्या काही दिवसात वेगाने वाढला आहे. मात्र तालुक्यातही आवश्यक उपाययोजना राबविल्या जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

 बारामतीतील रुग्णसंख्या 3209 इतकी झाली असतानाच बरे झालेल्या रुग्णांची संख्याही 2408 इतकी आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय असल्याचा दिलासा बारामतीकरांना आहे. नियमित होणारे मृत्यू ही बाब मात्र या सर्वात चिंताजनक असून मृत्यूचा आकडा आता 79 पर्यत जाऊन पोहोचला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The graph of the corona of Baramati began to descend