Manchar News : देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान - माजी खासदार आढळराव पाटील

'स्वतंत्र लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावर टीका करणारे कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना देशाबदल प्रेम नाही.
former mp shivajirao adhalrao patil
former mp shivajirao adhalrao patilsakal
Summary

'स्वतंत्र लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावर टीका करणारे कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना देशाबदल प्रेम नाही.

मंचर - 'स्वतंत्र लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावर टीका करणारे कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना देशाबदल प्रेम नाही. सावरकरांवर टीका करणाऱ्यांनी त्यांची पात्रता ओळखून घ्यावी.' अशी टीका शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवसेना, भाजप, महायुती यांच्या माध्यमातून आढळराव पाटील यांचे नेतृत्वाखाली मंचर शहरातून मंगळवारी (ता. ४) सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. गौरव यात्रेच्या सांगता सभेत आढळराव पाटील बोलत होते.

यावेळी भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव वर्षा डहाळे, आमदार उमा खापरे, भाजप किसान मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री संतोष खांबकर, जयसिंगराव एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, सागर काजळे, सुनील बाणखेले, अरुण गिरे, रवींद्र करंजखेले, विजय पवार, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, सचिन बांगर, सुशांत थोरात उपस्थित होते. श्री राम मंदिरापासून सावरकर गौरव यात्रेचा शुभारंभ झाला.

डहाळे म्हणाल्या 'स्वातंत्र्याच्या आग्नी कुंडात आयुष्याच्या समिधा वाहीलेल्या क्रांतीसुर्य विनायक दामोदर सावरकर यांची जीवनगाथा सांगण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढली आहे. स्वातंत्र्यवीरांच्या कार्य आणि निष्ठा यावर प्रश्नचिन्ह घेणाऱ्यांना या गौरव यात्रेतून सडेतोड उत्तर मिळत आहे.' स्वप्नील बेंडे पाटील, संतोष खामकर, गणेश बाणखेले, योगेश बाणखेले, मालती थोरात, जागृती महाजन, स्वप्ना खामकर, अशोक भोर यांनी व्यवस्था पहिली. विजय पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com