
पिंपरी/मुंबई : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग्रीन बाँडच्या (हरित कर्जरोखे) रकमेतून शहरात तयार होणाऱ्या पायाभूत सुविधा महत्त्वाच्या ठरतील. पर्यावरणपूरक हरित सुविधा तयार होऊन त्यात वाढ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. १०) केले.