

Pune News
esakal
पुणे: पुण्यातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातील बेकरी, हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबा अशा विविध ठिकाणी हरित इंधनाचा वापर करण्याची सूचना महापालिकेने दिली आहे. येत्या १५ दिवसांत संबंधित सूचनेनुसार हरित ऊर्जेचा वापर सुरू करावा, अन्यथा महापालिका व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.