
खडकवासला : पावसाच्या सरींनी न्हालेला सिंहगड, हिरवाईने नटलेले डोंगरदऱ्यांचे सौंदर्य आणि आल्हाददायक हवामान यामुळे शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस सिंहगडावर पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. सुट्टीचा शेवटचा दिवस आणि सोमवारपासून शाळांना सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी कुटुंबीयांसह गडावर येत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.