डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘ग्रीन हॉस्पिटल’ पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

असोसिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स, दिल्ली यांच्यावतीने बंगळूर येथे पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्राला आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा ‘ग्रीन हॉस्पिटल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पिंपरी - असोसिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स, दिल्ली यांच्यावतीने बंगळूर येथे पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्राला आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा ‘ग्रीन हॉस्पिटल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ॲलेक्‍झांडर थॉमस, महासंचालक डॉ. गिरिधर ग्यानी, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्रीन हॉस्पिटल हा पुरस्कार मिळणे ही फार अभिमानाची बाब आहे. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी (पुणे) हे पर्यावरणपूरक घटकांची अंमलबजावणी करत आहे. आधुनिक ऊर्जा साधनांच्या वापराबरोबर ऊर्जाबचतीला, तसेच पर्यावरण जतन व संवर्धनाला प्रोत्साहन देत आहे. हा पुरस्कार मिळाल्याने अधिकच आनंद होत आहे. ही कौतुकाची थाप उत्साह अधिक वाढविणारी आहे, त्यातूनच पुढे काम करायला प्रोत्साहन मिळाले आहे. ग्रीन हॉस्पिटल हा पुरस्कार मिळविण्यात सर्वांचेच योगदान फार महत्त्वाचे आहे.’

लोकसभेसाठी उमेदवारी मागितली नव्हती : विश्‍वजीत कदम

या पुरस्कारासाठी झालेल्या सर्वेक्षणात रुग्णालय व परिसरातील वृक्षांचे जतन, संवर्धन, पर्यावरणपूरक साधनांचा वापर, पाण्याचे योग्य नियोजन व शुद्धीकरण, पुनर्वापर, सौरऊर्जा प्रकल्प, खतनिर्मिती प्रकल्प, आधुनिक यंत्रणेतून विजेची बचत, प्लॅस्टिकबंदी, प्रदूषणमुक्त  वाहनाचा वापर, स्वच्छता, देखभाल, संसर्ग नियंत्रण, जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण प्रक्रिया, जनजागृतीपर संदेश फलक आदी प्रमुख घटकांचा समावेश करण्यात आला होता. 

या संपूर्ण उपक्रमाला डॉ. पी. डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्‍वस्त व कोशाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, 
अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर यांनी पुरस्कारासाठी परिश्रम घेतलेल्या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्‍टर्स, अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green Hospital award to dr dy patil hospital