
पतंगराव कदम यांचा मुलगा म्हणून मी हवेत नव्हतो. बॅंक, भारती विद्यापीठ यासह इतर जबाबदाऱ्या पार पाडल्या. ग्रामीण भागात जाऊन चारा छावणीवर काम केले. साहेबांच्या निधनानंतर माझ्या घरातील सर्वांनी ताकद दिल्याने मी मंत्री होऊ शकलो.
पुणे : ''पुण्यातून लोकसभेसाठी उमेदवारी मला देऊ नये असे दिल्लीतील नेत्यांना सांगितले होते. तरीही ग्रामीण भागात काम करणाऱ्या 32 वर्षाच्या तरुणाला संधी दिली होती. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्टी होती,'' असा दावा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पुण्यात केला.
राज्यमंत्री मंडळात समावेश झाल्याबद्दल भारती विद्यापीठातर्फे ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चि. शेजवलकर यांच्या हस्ते विश्वजीत कदम यांचा धनकवडीतील शैक्षणीक संकुलात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
विश्वजीत कदम यांनी 2014 ची लोकसभा निवडणुक पुण्यातून लढवली होती. त्यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पुण्यातील स्थानिक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांपैकी कोणालाही उमेदवारी द्या, पण बाहेरचा उमेदवार लादू नका, अशी मागणी पक्षश्रष्ठींकडे करत विश्वजीत कदम यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता.
राहुल गांधी यांच्या विश्वाताली तरुण चेहरा म्हणून विश्वजीत कदम यांनी पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मने वळविण्यासाठी प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना पराकाष्टा करावी लागली होती. तसेच कदम यांनी प्रचारासाठी स्वताःची समांतर यंत्रणाही उभी केली होती. तरीही भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी त्यांचा तीन लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता.
- अभिनेत्री मानसी नाईकच्या छे़डछाडप्रकरणी एकाला अटक
दरम्यान, सत्काराला उत्तर देत असताना कदम यांनी पुणे लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण मला पुण्यातून उमेदवारी देऊ नये असे मी दिल्लीतील नेत्यांना सांगितले होते. तरीही मला उमेदवारी देण्यात आली. ग्रामीण भागातील तरुणावर पक्षाने विश्वास दाखवून मला उमेदवारी देणे ही भाग्याची गोष्ट आहे.''
- INDvsAUS : 'कॅप्टन क्वीन'ची कमाल; 'या' विक्रमाशी साधली बरोबरी!
सत्कार स्विकारताना भावून झालेल्या कदम यांनी आठवणींना उजाळा देत, '' पतंगराव कदम यांनी देशभर शैक्षणिक कार्य केले, आदिवासी भागात शिक्षण संस्था सुरू केल्या, अनेक लोक जोडले. आयुष्यातील प्रतिकूल गोष्टींवर त्यांनी मात केली. यावेळी डॉ. शिवाजीराव कदम हे माझ्या वडिलांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले, आता माझ्यासोबतही उभे राहिले आहेत.
- डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळं त्या चिमुकल्याला मिळाला चेहरा!
सहकार, कृषी, सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून काम करताना लोकांच्या भल्यासाठी काम करेन. पतंगराव कदम यांचा मुलगा म्हणून मी हवेत नव्हतो. बॅंक, भारती विद्यापीठ यासह इतर जबाबदाऱ्या पार पाडल्या. ग्रामीण भागात जाऊन चारा छावणीवर काम केले. साहेबांच्या निधनानंतर माझ्या घरातील सर्वांनी ताकद दिल्याने मी मंत्री होऊ शकलो. जनतेने दाखविलेला हा विश्वास सार्थ ठरवेन.''