
नवी दिल्ली : पुणे मेट्रो प्रकल्पात दुसऱ्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ३३ किलोमीटर लांबीच्या या विस्तारीकरणावर ३६२६ कोटी रुपये खर्च होणार आहे. या विस्तारीकरणात वनाज ते चांदणी चौक (कॉरिडॉर २ ए) आणि रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (कॉरिडॉर २ बी) या मार्गांचे काम पूर्ण करण्यात येईल. यामुळे एकूण १५ स्थानकांना जोडणारा १२.७५ किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होणार आहे.