

Farmers’ Contribution Key to India’s Green Revolution
Sakal
मांजरी : ज्या अमेरिकेकडून कधीकाळी आपल्याला टाकाऊ अन्नधान्य आयात करण्याची वेळ आली होती, त्याच अमेरिकेसह अनेक देशांना आज आपण शेतमालाची निर्यात करीत आहोत. त्यामध्ये हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्यासह केंद्र सरकारचे सकारात्मक धोरण व शेतकऱ्यांनी दिलेले योगदानच महत्वपूर्ण आहे. असे गौरवोद्गगार भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयआयएसईआर) संचालक प्रा. सुनिल भागवत यांनी काढले.