
पुणे : जलप्रदूषण रोखण्याबरोबरच पाण्याची बचत करणाऱ्या आणि पर्यावरणपूरक असलेल्या खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान भूमिगत कालव्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पाचे काम मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याच्या राष्ट्रीय पाणी समितीने या प्रकल्पाची पाहणी केली असून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) देण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.