pune shirur flyover
sakal
पुणे - अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे ते शिरूर दरम्यान ५४ किलोमीटर लांबीचा सहापदरी इलेव्हेटेड महामार्ग (उड्डाणपूल) डीबीएफओटी (डिझाइन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर) या तत्त्वावर उभारण्यास महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्याचे रुंदीकरण करण्याबरोबरच उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.