Pune News : नदी काठ सुधारसाठी मिळाली ५२ हजार चौरस मिटर जागा; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

पुणे महापालिकेने सुमारे साडे तिनशे कोटी रुपये खर्च करून संगमवाडी ते बंडगार्डन पूल या दरम्यान मुळामुठा नदीचा काठ सुशोभित करण्याचे काम केले सुरु.
mula mutha riverfront project

mula mutha riverfront project

sakal

Updated on

पुणे - पुणे महापालिकेने सुमारे साडे तिनशे कोटी रुपये खर्च करून संगमवाडी ते बंडगार्डन पूल या दरम्यान मुळामुठा नदीचा काठ सुशोभित करण्याचे काम सुरु केले. पण यामध्ये भूसंपादन न झाल्याने प्रकल्प रखडला आहे. हा भूसंपादनाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने तब्बल ५२ हजार ८५१ चौरस मिटर एवढी शासकीय जमीन विनामूल्य महापालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com