esakal | Video : विजयस्तंभ शौर्य दिनी भीमा कोरेगावला येणार 25 लाख अनुयायी
sakal

बोलून बातमी शोधा

 To Greet Victory pillar in Bhima Koregaon 25 million followers will come

"शौर्य दिनासाठी ३० आणि ३१ डिसेंबरला येणाऱ्या अनुयायांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगची सुविधा जवळच्याच ठिकाणी करण्यात आली आहे." नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये म्हणून जनजागृती चालू असल्याचे डंबाळे म्हणाले.

Video : विजयस्तंभ शौर्य दिनी भीमा कोरेगावला येणार 25 लाख अनुयायी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी २५ लाख अनुयायी येणार आहे. त्यासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा जिल्हा प्रशासन आणि समन्वय समितीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, जयदेव गायकवाड आदि उपस्थित होते.

डंबाळे म्हणाले,"शौर्य दिनासाठी ३० आणि ३१ डिसेंबरला येणाऱ्या अनुयायांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगची सुविधा जवळच्याच ठिकाणी करण्यात आली आहे." नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये म्हणून जनजागृती चालू असल्याचे डंबाळे म्हणाले.

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना पुण्यात जिल्हाबंदी

यावेळी बागवे म्हणाले,"भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाचा सीबीआय चौकशी करण्यात यावी. तसेच दंगळीसाठी संशयित आरोपी असलेले संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात यावी अशी चळवळीची मागणी आहे." मागच्या सरकारने चुकीच्या पद्धतीने तपस केल्याचे डंबाळे म्हणाले. तसेच तातडीने तपास पूर्ण करावा असे ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप