esakal | संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना पुण्यात जिल्हाबंदी
sakal

बोलून बातमी शोधा

bhide.jpg

हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह 163 जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना पुण्यात जिल्हाबंदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह 163 जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 

कोरेगाव भीमामध्ये एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांना कोरेगाव भीमामध्ये सभा घेण्यास परवानगी देण्याचं ठरवण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकबोटे आणि भिंडेंसह एकूण 163 आरोपींना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी 2018 मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.

- नागरिकत्व सुधारणा विधेयकावर डाॅ. अमोल कोल्हे म्हणाले...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने काल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भिडे आणि एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केलं आहे. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे.