esakal | Pune : खडकवासला येथील ऐतिहासिक 'गांधी चौकात' महात्मा गांधीजींना अभिवादन
sakal

बोलून बातमी शोधा

pune

खडकवासला येथील ऐतिहासिक 'गांधी चौकात' महात्मा गांधीजींना अभिवादन

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी 15 नोव्हेंबर 1945 रोजी भेट दिलेल्या खडकवासला गावातील ऐतिहासिक 'गांधी चौकात' महात्मा गांधीजींना जयंतीनिमित्त आमदार संग्राम थोपटे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. विविध क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. कॉंग्रेसच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघ पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ब्रिटिश सरकारला भारतातून परतवून लावण्यासाठी महात्मा गांधीजींनी 1942 साली 'छोडो भारत चळवळ' सुरू केली. सनदशीर मार्गाने सरकारच्या विरोधात आंदोलने,मोर्चे काढण्यात येत होते. 'छोडो भारत' चळवळीबाबत भारतीयांना माहिती देण्यासाठी व जागृती करण्यासाठी महात्मा गांधी देशभरातील गावोगावी फिरत होते. याचदरम्यान 15 नोव्हेंबर 1945 रोजी महात्मा गांधीजींनी सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावाला भेट दिली होती. त्यावेळी गांधीजी ज्या चौकात थांबले होते त्या चौकाचे नामकरण 'महात्मा गांधी चौक' असे करण्यात आले आहे. सुमारे सत्तर वर्षांपासून या ऐतिहासिक महात्मा गांधी चौकात जयंतीनिमित्त गांधीजींना अभिवादन करण्यात येते.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जागतिक शरीर सौष्ठव पारितोषिक विजेते महेश हगवणे, नदी स्वच्छतेसाठी प्रयत्न करणारे पराग मते, क्रिडा प्रशिक्षक मधुकर वांजळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष चाकणकर, किर्तनकार व शिवव्याख्याते धर्मराज हांडे व सिंहगड अभ्यासक डॉ नंदकिशोर मते यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम थोपटे, प्रदेश काँग्रेसचे सदस्य श्रीरंग चव्हाण, सचिव संजय बालगुडे, प्रवक्ते गोपाळ तिवारी, खडकवासला विधानसभा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल मते, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास मते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आनंद मते, शिवसेनेचे संदीप मते, मनसेचे विजय मते, ॲड. अरविंद मते, नूर सय्यद यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image
go to top