हडपसर पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पालघन, कोयता, दुचाकीसह 30 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई बुधवारी रात्री हडपसरमधील साडेसतरा नळी येथे करण्यात आली. 

पुणे : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पालघन, कोयता, दुचाकीसह 30 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई बुधवारी रात्री हडपसरमधील साडेसतरा नळी येथे करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

योगीराज संदीप पानसरे (वय 20), दीनेश धनंजय राखपसरे (वय 19) व सोमनाथ योगेश चौधरी (वय 18, सर्व रा. मांजरी बुद्रुक, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबरोबरच दोन अल्पवयीन मुलांनीही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोजच्याप्रमाणे हडपसर पोलिस बुधवारी रात्रीही हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रगस्त घालत होते. त्यावेळी सातेसतरा नळी परिसरात तिघेजण दुचाकीवर संशयास्पदरीत्या थांबले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी योगीराज, दीनेश, सोमनाथ यांना अडवून त्यांच्याकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तपासणी केली. तेव्हा त्यांच्याकडे कोयता, पालघन, कटावणी, दोरी, दुचाकी असा ऐवज मिळून आला. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर ते साडेसतरा नळी परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: group of theft arrested by Hadapsar Police