सुवर्ण त्रिकोणाने वाढवा व्यवसाय - सुमालता राव

या गोल्डन ट्रॅंगल माध्यमातून व्यवसाय वाढवला पाहिजे
Bank
BankSakal

पुणे : उद्योग आणि व्यवसायवृद्धीसाठी सुवर्ण त्रिकोण (गोल्डन ट्रॅंगल) चांगला उपयोग होत आहे. राज्यातील नागरी सहकारी, जिल्हा बॅंका आणि पतसंस्थांनी या गोल्डन ट्रॅंगल माध्यमातून व्यवसाय वाढवावा, असे आवाहन नेशन्स वर्क सोल्युशन प्रोव्हायडर्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सिईओ) सुमालता राव यांनी सोमवारी (ता. ४) येथे सहकार क्षेत्रातील सर्व बॅंकांना केले.

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषदेत "बिझीनेस प्रोसेस रि-इंजिनिअरींग डेव्हलपमेंट अॅंड ट्रेनिंग" या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.राव म्हणाल्या, "प्रोसेस, पिपल आणि ट्रेनिंग (पीपीटी) या तीन मुद्यांवर आधारित हा गोल्डन ट्रॅंगल आहे. यामध्ये संधी, संभाव्य धोक्याचे व्यवस्थापन प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान आदी बाबींचा समावेश आहे."

यामुळे नव-नवीन उत्पादनांची निर्मिती होते. या नाविन्यपूर्ण उत्पादनांमुळे बॅंकांचा व्यावसाय वाढण्यास मदत होते. या तंत्रज्ञानाचा एचडीएफसी आणि आयसीआयसीआय आणि गोदावरी नागरी सहकारी या तीन बॅंकांना झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com