शिक्षणात संवेदनांची वाढ खुंटली - डॉ. मोहन आगाशे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Dr Mohan Aagashe
Dr Mohan AagasheSakal
Updated on
Summary

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुणे - ‘मौखिक संवाद ते डिजिटल संवादाच्या (Digital Communication) प्रवासात लेखन परंपरा आली. मात्र, लेखन परंपरा जोपासण्याच्या प्रयत्नात आपण चित्रसंवाद, ध्वनिसंवाद, संवेदना, दुसऱ्या भाषा मागे टाकल्या. आजच्या शिक्षणात (Education) केवळ शब्दांची भाषा आहे. त्यामुळे शिक्षणातील संवेदनांची वाढ खुंटली,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Dr Mohan Aagashe) यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखा अधिकारी शिल्पा भिडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य आदी उपस्थित होते. या वेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारती ठाकूर, आयुर्वेद विषयात काम असणारे डॉ. सदानंद सरदेशमुख, शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ. एम. स. गोसावी, शैक्षणिक व सामाजिक कामात नावलौकिक मिळवलेले डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्योती देशमुख, सामाजिक व सहकार क्षेत्रातील रमेश थोरात, विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण अडसूळ, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील प्रमोद कांबळे, निवेदक आनंद देशमुख आदींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या युवा गौरव पुरस्कारांमध्ये विनायक लष्कर यांना सामाजिक कार्यासाठी, लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांना साहित्य क्षेत्रातील, कला क्षेत्रात चिंतन उपाध्याय, तर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार टेनिसपटू अंकिता रैना यांना प्रदान करण्यात आला.

Dr Mohan Aagashe
तुमचे गाणे सदैव आमच्या सोबत राहील

कार्यक्रमात विद्यापीठाचे व्हिजन डॉक्युमेंट, विद्यापीठ वर्धापनदिन विशेषांक आणि दुर्मीळ व्याख्यानांच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘विद्यापीठात क्रिडा संकुलापासून ते सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कामही आता पूर्ण होत आहे. पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्याची आवश्यकता आहे. आंतरविद्याशाखीय, समाजाभिमुख शिक्षण आणि संशोधनासाठी प्रयत्न केले जात आहे.’’

भाषेपलीकडे ध्वनीची, चित्रांची आणि असंख्य प्रकारच्या भाषा आहेत. ज्या आपण शिकलो तरच आपलं आयुष्य समृद्ध होईल. औपचारिक शिक्षणात या सर्व भाषांचा समावेश होणे गरजेचे आहे.

- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते

विद्यापीठाने ७३ वर्षांच्या प्रवासात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गौरव प्राप्त केले आहेत. मी इथला विद्यार्थी असल्यामुळे स्थानिक आणि शैक्षणिक प्रश्नांची जाणीव होती. त्यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com