तुमचे गाणे सदैव आमच्या सोबत राहील

कलाकारांकडून लतादीदींना कला माध्यमातून श्रध्दांजली
 लतादीदींना कला माध्यमातून श्रध्दांजली
लतादीदींना कला माध्यमातून श्रध्दांजलीsakal
Updated on

कोथरूड: निवेदिता प्रतिष्ठान' तर्फे भारतरत्न स्वरसम्राज्ञी लतादिदिंना संगीत,नृत्य व चित्रांतून श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाणसभागृह येथे संपन्न झाला. तुमचे गाणे सदैव आमच्या सोबत राहील अशी भावना कलाकारांनी यावेळी व्यक्त केली.

 लतादीदींना कला माध्यमातून श्रध्दांजली
१०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्राची आग सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच विझविली

संत ज्ञानेश्वरांच्यालता दिदिंनी गायलेल्या ओव्यांवर कथ्थक नृत्यातूनशिल्पा अंतापूरकर, कांचन पालकर यांनी श्रद्धांजलीदिली.'प्रतिष्ठान' च्या'आकृती' गटाच्या महिला चित्रकार अनिता देशपांडे, स्वाती केणे, अनुराधा कुलकर्णी व उर्मिला दुरगुडे यांनी लतादिदिंचे वेगवेगळ्या माध्यमातून चित्र काढून तर स्मिता जकातदार यांनी रांगोळीतून आपल्या आवडत्या लता दिदींना श्रद्धांजली वाहीली. त्या बरोबरच प्रतिष्ठानाच्या सदस्या व पुण्यातील २० नामवंत गायिकांनी लता दिदिंची अवीट गाणीसादर केली. या कार्यक्रमास लता दिदिंना साथसंगत केलेले तबला वादक राजू दूरकर व सिंथेसायजर वादक विवेक परांजपे उपस्थित होते.

 लतादीदींना कला माध्यमातून श्रध्दांजली
'कला' शब्दाला डिजिटली माध्यमातून सजवणार कलाकार

यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी श्रध्दांजली वाहीली.ज्येष्ठ नागरिक आसावरी खेडलेकर यांनी लतादीदींवर तयार केलेली एक कविता यावेळी सादर केली.

कार्यक्रमाचे संयोजन व सूत्र संचालन संयोजिका अँड. अनुराधा भारती यांनीकेले. आभार डॉ. श्रुतीदातार व शंतनू पेंढारकर यांनी मानले.

रंगमंचावर गायक गात असताना तीन कलाकार चित्र साकारत होते तर एकजण रांगोळी काढून लतादीदींबद्दलच्या आपल्या भावना कलेतून व्यक्त करत होते.संत ज्ञानेश्वरांच्या लता दिदिंनी गायलेल्या ओव्यांवर कथ्थक नृत्यातूनशिल्पा अंतापूरकर, कांचन पालकर यांनी श्रद्धांजली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com