गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपला महाराष्ट्रातून १०० डिजिटल व्हॅनची रसद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपला महाराष्ट्रातून १०० डिजिटल व्हॅनची रसद

पारगाव : गुजरात विधानसभा निवडणकीचे बिगुल वाजले असून निवडणूक जाहीर होण्या अगोदर एक महिन्यापासून भाजपच्या वतीने गुजरात मध्ये जोरदार डिजिटल प्रचार मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील एलईडी स्क्रीन वाल्या डिजिटल व्हॅनला मोठी मागणी वाढली आहे. महाराष्ट्रातून गेलेल्या एकूण १०० डिजिटल व्हॅन गुजरातच्या खेडोपाडी भाजपचा प्रचार करत आहे यामध्ये पुणे जिल्ह्यातील ३० डिजिटल व्हॅन आहेत.

गुजरात निवडणूक नुकतीच जाहीर झाली असली तरी तेथील सत्ताधारी भाजपा पक्षाच्या वतीने सुमारे एक महिन्यापासून एलईडी स्क्रीन वाल्या डिजिटल व्हॅन व्दारे संपूर्ण गुजरात मध्ये प्रचार मोहीम राबवून चित्र फितीच्या माध्यमातून भाजपा सरकारने केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोचवली जात आहे त्यासाठी ज्या डिजिटल व्हॅन वापरल्या जात आहे त्यापैकी १०० व्हॅन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून गेल्या असून पुणे जिल्ह्यातून ३० व्हॅन गेल्या आहेत तर आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील उद्योजक गिरिधर थोरात हे स्वताच्या तीन डिजिटल व्हॅन घेऊन गुजरात मधील सुरत जिल्ह्यात प्रचार करत आहे.

गिरिधर थोरात हे गेली सात वर्षापासून एलईडी स्क्रीन असलेल्या डिजिटल व्हॅन बनवून निवडणूक प्रचार किंवा व्यावसायिक जाहिरातीचा व्यवसाय करतात. त्यांच्या स्वताच्या मालकीच्या तीन व्हॅन आहेत एका व्हॅन साठी प्रती महिना दोन ते सव्वा दोन लाख रुपयांपर्यंत भाडे मिळते असे श्री. थोरात यांनी सांगितले निवडणुकीच्या काळात डिजिटल व्हॅनला चांगली मागणी असल्याने चांगले भाडे मिळते असे श्री. थोरात यांनी सांगितले.