
देहूरोड इथं थॉमस कॉलनीत प्रेमसंबंधातून एका १६ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती. तर मुलाचा चुलत भाऊ हल्ल्यात जखमी झाला आहे. दिलीप मौर्य असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. तर त्याचा अल्पवयीन भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय आरोपी सनी सिंग याला अटक केलीय. प्रेयसीचे दिलीपसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपी सनीने दिलीपची हत्या केली.