बारामती : तांदुळवाडी बहरली गुलमोहोराच्या सुंदर झाडांनी...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

- शहरातील तांदुळवाडी परिसर सध्या लाल बुंद झालेला आहे.

बारामती : शहरातील तांदुळवाडी परिसर सध्या लाल बुंद झालेला आहे. या भागात उन्हाळ्यात बहरणारे गुलमोहोर छान बहरले असून डोळ्याला वेगळा सुखद अनुभव देत आहे. शहरानजीक असलेल्या या परिसरामध्ये नगरसेवक जय पाटील यांनी गेल्या काही वर्षात वृक्षारोपण केलेले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी त्यांनी विचारपूर्वक झाडांची निवड करुन वृक्षारोपण केलेले आहे. स्वखर्चाने पाटील यांनी हा उपक्रम राबविला. या भागाचे लोकप्रतिनिधित्व करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हा भाग हिरवागार असावा या उद्देशाने काही हजार झाडे लावली गेली. ही झाडे नुसती लावली नाहीत तर त्यांची जोपासनाही त्यांनी मनापासून केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तांदुळवाडी हा भाग हद्दवाढीनंतर बारामती नगरपालिकेच्या हद्दीत आला. सरपंच म्हणून कार्यरत असतानाही जय पाटील यांनी या परिसराचा कायापालट करण्याच्या दृष्टीने या भागात वृक्षारोपण केलेले आहे. या भागातील गुलमोहोराची झाडे अधिक व्यवस्थित वाढण्यासाठी खड्डे घेण्यापासून ते झाडे मोठी झाल्यानंतरही त्यांचे संगोपन व पाणी देण्यापासून काही झाडांच्या पुर्नलागवडीचेही काम त्यांनी केले. आज त्याचाच परिणाम म्हणून जवळपास दोन ते अडीच कि.मी.त्या रस्त्यावर गुलमोहोराची सुंदर झाडे बहरलेली दिसतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gulmohor Tree in Tandulwadi Baramati