Pune Accident: गुलटेकडी उड्डाणपुलावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Bike Accident: पुण्यात गुलटेकडी उड्डाणपुलावर भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत ७६ वर्षीय दुचाकीस्वार नरसिंगमल तातेड यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : गुलटेकडीतील उड्डाणपुलावर भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, स्वारगेट पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.