

Gun Firing
पुणे - दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल परिसरात घडली. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गोळीबाराची घटना नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याबाबतचा उलगडा झालेला नाही.